Ad will apear here
Next
नीरजा - धीरोदात्त वीरांगना!


नीरजा भानोत! तशी कुणालाही फारशी परिचित नसलेली ती इन मिन तेवीस वर्षे वयाची तरुणी. ‘हिंदुस्थान टाइम्स’चे तेव्हाचे मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार हरीश भानोत यांची ती कन्या, हीच काय ती तिची ओळख.

... पण सुंदर, सुडौल व नाजुक दिसणाऱ्या नीरजामधील रणरागिणींचे दर्शन साऱ्या जगाला झाले व एका रात्रीत नीरजा साहस व कर्तव्य तत्परतेची प्रतीक बनली. दुर्दैवाने हे कौतुक सुरू होण्यापूर्वीच नीरजा जगाचा निरोप घेऊन निघून गेली होती. हवाई अतिरेक्यांच्या गोळ्यांची शिकार बनली होती.

नीरजा पॅन-ॲम विमान कंपनीत हवाई सुंदरी म्हणून काम करत होती. ५ सप्टेंबर १९८६ रोजी कराची विमानतळावर तिच्या विमानात अतिरेकी चढले. त्यांनी पायलटना कॉकपिटमधून बाहेर काढले. प्रवाशांपैकी जे अमेरिकन असतील, त्यांचे पासपोर्ट जमा करण्याची मागणी त्यांनी नीरजाकडे केली. तिने ठामपणे नकार दिला. ही हुज्जत तब्बल १५ तास चालली. अखेर अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट करून विमान उडवून देण्याची धमकी दिली.

नीरजाने मोठ्या शिताफीने विमानाचा दरवाजा उघडला व प्रवाशांना बाहेर काढायला सुरुवात केली. खरे तर ती स्वत: आधीच उतरू शकली असती; पण नीरजाने आधी लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले.

ती एका सात वर्षांच्या मुलाला बाहेर काढत असताना संतापलेल्या अतिरेक्यांनी तिच्यावर बेछूट गोळीबार केला. तिच्या शरीराची चाळण झाली; पण तिने मुलाला वाचवले व मगच ती कोसळली.

हा अमेरिकन मुलगा पुढे पायलट झाला. त्याने लिहिले : ‘माझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट नीरजाच्या बलिदानाचे आहे.’

भारत सरकारने मरणोत्तर अशोकचक्र प्रदान करून नीरजाच्या सर्वोच्च त्यागाचा सन्मान केला. तिच्या साहसाला सलाम!

- भारतकुमार राऊत

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BUSWCV
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
‘ल्युटिन्स’चा कर्ता ज्याला नवी दिल्ली शहराची थोडी फार माहिती व शहराच्या इतिहासाची जाण आहे, त्यांना ‘ल्युटिन्स’ परिसराची माहिती असतेच. प्रशस्त रस्ते, दुतर्फा शोभिवंत फुलझाडे, शोभिवंत चौक आणि परिसरात सुंदर टुमदार बंगले व प्रशस्त प्रशासकीय इमारती हे सारे वैभव ही भारताच्या राजधानीची शान आहे. हा भाग ज्यांनी वसवला ते कल्पक वास्तुकार एडविन ल्युटिन्स

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language